Posts

Showing posts with the label आरोग्य विभाग 2021

आरोग्य विभागाची 31 ऑक्टोबरची परीक्षा रद्द होण्याची शक्यता.

Image
आरोग्य विभागाची 31 ऑक्टोबरची परीक्षा रद्द होण्याची शक्यता. 31 ऑक्टोबरला होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे. परंतु, त्यासंदर्भातील निर्णय वरिष्ठांना विचारूनच फायनल केला जाईल, असे मत अधिकाऱ्यांचे आहे.    आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन् प्रश्नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे उमेदवारांचा राज्य सरकारबद्दल रोष वाढला आहे. त्यामुळे पुढील परीक्षेपूर्वी आरोग्य विभागाला ठोस नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील, तेवढ्यातच 30 ऑक्टोबरपासून शाळा बंद होणार असून, शिक्षकांना दिवाळी (Diwali) सुट्टी लागणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरला होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे. परंतु, त्यासंदर्भातील निर्णय वरिष्ठांना विचारूनच फायनल केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शासकीय रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली आहे. त्यापैकी 'न्यासा' या कंपनीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी सोपव...